नवीन विकास बँक (NDB), आशिया विकास बँक/ एशियन विकास बँक ADB
नवीन विकास बँक ( NDB) प्रस्तावना नवीन विकास बँक ही ब्रिक्स विकास बँक म्हणून देखील ओळखली जाते. ही एक अनेकविध बँक आहे. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील रशिया भारत चीन आणि साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश होतो. 2012 मध्ये ब्रिक्स देशांच्या चौथ्या मिटिंग मध्ये भारताने नवीन विकास बँकेची कल्पना मांडली. सहाव्या मीटिंगमध्ये म्हणजेच 15 जुलै 2014 मध्ये ब्रिक्स देशांनी नवीन विकास बँकेला तत्वतः मान्यता दिली. आणि आणि नवीन विकास बँकेची स्थापना IMF आणि जागतिक बँकेला पर्यायी व्यवस्था म्हणून झाली. उद्दिष्टे: सामाजिक दृष्ट्या पर्यावरणीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या चिरस्थायी असणाऱ्या विकास प्रकल्पांमध्ये भागीदारी करणे सदस्य देशांना फायदेशीर असणाऱ्या पायाभूत आणि चिरस्थायी विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देणे राष्ट्रीय विकास बँक आणि इतर विकास संस्थांद्वारे जागतिक भागीदारी साठी मोठ्या स्वरूपात संपर्क जाळे (नेटवर्क) प्रस्थापित करणे ...